Maharashtra Public Holidays 2024 विविध राज्य सरकारांनी राज्यभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Public Holidays 2024) सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या एका परिपत्रकात कॅलेंडर वर्ष 2024 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2024 साठी 17 राजपत्रित आणि 31 प्रतिबंधित सुट्ट्यांची यादी देखील जारी केली.
Maharashtra Public Holidays 2024 नुसार महाशिवरात्रीची सुट्टी 8 मार्च रोजी, होळीची सुट्टी 25 मार्च रोजी, गुढीपाडवाची सुट्टी 9 एप्रिल, महावीर जयंतीची सुट्टी 21 एप्रिल, महाराष्ट्र दिनाची सुट्टी 1 मे, बकरीदची सुट्टी 17 जून, स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्षाची सुट्टी 15 ऑगस्ट, गणेश चतुर्थीची सुट्टी 07 सप्टेंबर, दसऱ्याची सुट्टी 12 ऑक्टोबर, दिवाळीची सुट्टी 1 आणि 2 नोव्हेंबर, गुरुनानक जयंतीची सुट्टी 15 नोव्हेंबर रोजी आहे.
Maharashtra Public Holidays 2024 List
प्रजासत्ताक दिन - शुक्रवार 26 जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती - सोमवार 19 फेब्रुवारी
महाशिवरात्री - शुक्रवार 8 मार्च
होळी - सोमवार 25 मार्च
गुड फ्रायडे - 29 मार्च
गुढी पाडवा - मंगळवार 9 एप्रिल
रमजान-ईद (ईद-उल-फित्र) - गुरुवार 11 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - रविवार 14 एप्रिल
राम नवमी - बुधवार 17 एप्रिल
महावीर जन्म कल्याणक - रविवार 21 एप्रिल
महाराष्ट्र दिन - बुधवार 1 मे
बुद्ध पौर्णिमा - गुरुवार 23 मे
बकरीद (ईद-उल-जुहा) - सोमवार 17 जून
मोहरम - बुधवार 17 जुलै
स्वातंत्र्य दिन - गुरुवार 15 ऑगस्ट
पारशी नववर्ष (शहानशाही) - गुरुवार 15 ऑगस्ट
गणेश चतुर्थी - शनिवार 7 सप्टेंबर
ईद-ए-मिलाद - सोमवार 16 सप्टेंबर
महात्मा गांधी जयंती - बुधवार 2 ऑक्टोबर
दसरा - शनिवार 12 ऑक्टोबर
दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) - शुक्रवार 1 नोव्हेंबर
दिवाळी (बली प्रतिपदा) - शनिवार 2 नोव्हेंबर
गुरु नानक जयंती - शुक्रवार 15 नोव्हेंबर
ख्रिसमस - बुधवार 25 डिसेंबर