Festival Posters

लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल : टोपे

Webdunia
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (07:39 IST)
राज्यातील लॉकडाउनबाबत आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
 
“स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
 
पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.
 
“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने महागाई भत्ता वाढवला

Ashok Kharat case अशोक खरात ३० एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहणार; पोलीस पाचव्या प्रकरणात रिमांडची मागणी करणार

महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले-विरोधकांनी महिला शक्तीच्या वाढीला खीळ घातली, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील धर्मांतर आणि अमली पदार्थांच्या प्रकरणांवर उच्चस्तरीय बैठक बोलावली

LIVE: २० ते २२ एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

पुढील लेख
Show comments