Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाजन बंधू करणार विश्‍वविक्रमी कामगिरी

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (17:11 IST)
नाशिकचे विक्रमवीर सायकलीस्ट डॉ. महाजन बंधू (हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन) यांनी आजपर्यंत अनेक सायकल स्पर्धा गाजविल्या आहेत. आता येत्या १८ डिसेंबरला डॉ. महाजन बंधू 'गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया' ही आगळी वेगळी सफर करणार आहेत. भारतातील ४ महानगरांना जोडणाऱ्या महामार्गांवरून तब्बल सहा हजार ६००० किमीचा प्रवास ते सायकल वरून करणार आहेत. सायकल सफर करताना ‘करुनी पालन नियमांच, उजळूया भाग्य भारताचे|’ असा संदेश देणार असल्याची माहिती महाजन बंधूंनी दिली आहे. ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’च्या धर्तीवर 'रेस अॅक्रॉस इंडिया'ची ही रंगीत तालीम मानली जात असून भविष्यात शक्य झाल्यास अशी स्पर्धा आयोजित करू असे नाशिक सायकलीस्टचे जसपाल सिंघ यांनी सांगितले. 
 
अशी असेल गोल्डन रॅली :
डॉ. महाजन बंधू रिले या क्रीडा प्रकारात म्हणजेच न थांबता आलटून-पालटून सायकलिंग करतील. म्हणजेच एक जण सायकल चालवत असताना दुसरा बॅकअप व्हॅनमध्ये आराम करेल दुसरा सायकल चालवेल त्यावेळी पहिला आराम करेल, असे रिलेचे नियोजन केले जाते. दिशादर्शन, सायकलपटूंचे आहार नियोजन, आरोग्य तसेच सायकलची देखभाल घेण्यासाठी मदतनीसांचा चमू नेहमीच सज्ज असणार आहे अशी माहिती डॉ. हितेंद्र महाजन यांनी सांगितले. या मोहिमेचा एकूण खर्च १० लाख असून त्यासाठी सायकलप्रेमींना आवाहन करण्यात येत असल्याचेही जसपालसिंग यांनी सांगितले. ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेचे विजेतेपद, ‘टूर ऑफ ड्रॅगन’ (डेथ रेस) मध्ये सहभाग अशा अनेक शिखरे पादाक्रांत केल्यानंतर हे स्वदेशी स्पर्धेचा झेंडा रोवून ती पूर्ण करण्याचे आव्हान महाजन बंधुंसमोर असणार आहे. 
   
असा असेल मार्ग :
१८ डिसेंबरला मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार्‍या सायकलफेरीचा चेन्नई-कोलकाता-दिल्ली-मुंबई असा मार्ग राहणार अाहे. 
 
दोघांसमवेत प्रत्येकी एक बॅकअप व्हॅन, सहा मदतनीस या पद्धतीने एकूण दोन बॅकअप व्हॅन आणि १२ मदतनीसांची टीम सज्ज राहणार आहे. ही दोघांच्या मागे राहणार आहेत. ६००० किलोमीटरचा पल्ला १२ दिवसात म्हणजेच प्रतिदिन सरासरी ५०० किमी अंतर कापण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र हा पल्ला मोठा असल्याने विविध ठिकाणांच्या वेगळ्या हवामान स्थितीचा सामना करत सायकलिंग करावे लागणार आहे. हवामान परिस्थितीचा शास्रीय अभ्यास करून हा मार्ग ठरविण्यात आला आहे असे डॉ. महेंद्र महाजन यांनी सांगितले. या रॅलीत सरासरी २५ ते ३० किलोमीटर प्रतितास असा वेग राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून १२ दिवसाच्या आत हा प्रवास पूर्ण करू असा विश्वास डॉक्टर बंधूंनी केला आहे.
 
या सायकल सफरीतून दिला जाणारा संदेश :
‘करुनी पालन नियमांच, उजळूया भाग्य भारताचे|’ असा संदेश घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयीची जागरूकता जनमानसात निर्माण करण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. महाजन बंधूंच्या आधीच्या कामगिरीची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतल्यानंतर आता 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे प्रतिनिधी या सफरीचे परीक्षण करण्यास येत आहेत. ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’, ‘टूर ऑफ ड्रॅगन’ (डेथ रेस) अशा स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवणारे डॉ. महाजन बंधू एक नवा विक्रम प्रस्थापित करतील.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

आसाममध्ये 10 महिन्यांच्या बाळाला एचएमपी विषाणूची लागण

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मानवी' वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यात जनता दरबार घेण्याचे अजित पवार यांचे आदेश, या दिवशी भरणार दरबार

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली

पुढील लेख
Show comments