दहावी आणि बारावीचे परिक्षा सुरु झाल्यापासून आता पेपर फुटीचे सुद्धा सत्र सुरु झाले आहे. कधी मराठी तर कधी गणिताचा पेपर फुटून सोशल मिडीयावर येत आहे. असाच प्रकार पुनः घडला आहे. आज मुंबई येथे पुनः पेपर फुटला आहे. बारावीच्या बुक कीपिंग विषयाचा पेपर फुटला आहे . ही सर्व प्रकार डॉ. टी. आर. नरवणे विद्यालयात घडला आहे. यामध्ये पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. तर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल आणि इतर गोष्टी परीक्षा केद्रात बंदी असताना हे पेपर फुटतात कसे असा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थी हे करत नसून नेमके कोण करतय या कडे सर्वांचे लक्ष आहे. पोलीस तापस घेत आहेत.