Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (20:37 IST)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

08:40 PM, 13th Nov
मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर
महाराष्ट्र: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

06:30 PM, 13th Nov
Breaking News :मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर
महाराष्ट्र: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

05:36 PM, 13th Nov
अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे'घोषणेला विरोध
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' घोषणेचे समर्थन केले, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'घोषणेला विरोध केला 
 

04:47 PM, 13th Nov
Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार,अमित शहांची घोषणा
महाराष्ट्र निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले असून प्रचार सभा घेण्यात येत आहे. अमित शहा देखील प्रचार सभा घेत आहे. मुंबईत त्यानी सभेत बोलतांना नरेंद्र मोदी सरकार काहीही झाले तरी वक्फ बोर्ड कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करेल आणि त्यानंतर कोणीही खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करू शकणार नाही, अशी गर्जना केली

04:32 PM, 13th Nov
उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युती आपले सरकार टिकवण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे.तर महाविकास आघाडी देखील सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे.

03:32 PM, 13th Nov
शरद आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? काय म्हणाले नवाब मालिक..
 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 20नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार विविध मतदार संघातून उभे केले आहे. भाजपचे विरोध असताना राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटातून मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे.
 

03:15 PM, 13th Nov
चांदिवली प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी राजकारण्यांवर निशाणा साधत महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल केली चिंता व्यक्त
राज ठाकरे म्हणाले की, संपूर्ण राज्यात असे घृणास्पद राजकारण सुरू आहे. नेते आपल्याच पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात सामील होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी हे नेते काहीही करायला तयार असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध राहावे, असेही राज ठाकरे म्हणाले.  

11:47 AM, 13th Nov
खलिस्तानी दहशतवाद्याच्या धमकीनंतर राम मंदिराची सुरक्षा वाढली
Ayodhya News : कॅनडास्थित खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांनी हल्ल्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केल्यानंतर मंगळवारी सकाळी अयोध्येतील राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली
 

11:46 AM, 13th Nov
गोंदियामध्ये राहुल गांधी यांनी संविधानाबाबत भाजपवर टीकास्त्र सोडले

11:45 AM, 13th Nov
झारखंड निवडणूक: 43 विधानसभा जागांवर मतदान सुरु
रांची- झारखंडमध्ये विधानसभेच्या 43 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सुमारे 13.04 टक्के मतदान झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 

11:44 AM, 13th Nov
महायुतीने मुंबई राहण्यायोग्य केली-अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईमध्ये मुंबईबद्दल मोठे वक्तव्य केले. राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई राहण्यायोग्य केली आहे.

10:27 AM, 13th Nov
अचलपूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
गेल्या तीन दिवसांपासून मी खरगे यांचे म्हणणे ऐकत आहे. मी योगी आहे आणि माझ्यासाठी राष्ट्र सर्वोच्च आहे. तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण सर्वोच्च आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही, असा टोला योगिनीं खरगेंना लगावला. 

10:26 AM, 13th Nov
सत्तेसाठी भाजपने ठाकरे आणि पवारांचे कुटुंब तोडले-खासदार प्रमोद तिवारी

09:31 AM, 13th Nov
लातूरमध्ये हेलिकॉप्टरची तपासणी,नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई

09:30 AM, 13th Nov
महाविकास आघाडीच्या बोलण्यात येऊ नका, अकोल्यात म्हणाले योगी आदित्यनाथ
भगवान राम आणि कृष्ण अस्तित्वात नाही असे काँग्रेस म्हणते.  या निवडणुकीत अशा काँग्रेसचे अस्तित्वच संपवू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

09:29 AM, 13th Nov
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला रोखून देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि भाजपला सत्तेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल एक तरुण त्यांना 'देशद्रोही' म्हणतांना आढळला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Baba Siddique हत्याकांड: मृत्यूची पुष्टी होईपर्यंत शूटर हॉस्पिटलच्या बाहेर थांबला

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi दाऊदला देखील पक्षातून उभे करणार, म्हणत नागपुरात नाना पटोले यांची भाजपवर टीका

दाऊदला देखील पक्षातून उभे करणार, म्हणत नागपुरात नाना पटोले यांची भाजपवर टीका

Video गर्भवती महिलेला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागली

1956 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगी हिस्सा मागू शकत नाही, मालमत्ता वादात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments