Marathi Biodata Maker

दहावीची ७ मार्चला, तर बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (10:29 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाने गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान तर, दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा पूर्वी जाहीर झालेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार होणार असून, दहावीच्या परीक्षेत इतिहास आणि भूगोलसह सर्वच विषयांच्या पेपर दरम्यान एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
 
मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकात इतिहास आणि भूगोल या दोन विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी नव्हती. मात्र, अंतिम वेळापत्रकात इतिहास आणि भूगोल यांच्यासह सर्वच विषयांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून, मंडळाकडून परीक्षेपूर्वी शाळा आणि ज्युनियर कॉलेजांकडे पाठविले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल. तसेच, मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वंतत्रपणे शाळा आणि कॉलेजांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
 
*दहावीचे वेळापत्रक* 
तारीख वेळ विषय
 
७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल
 
*बारावीचे वेळापत्रक*
तारीख वेळ विषय
 
२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
 
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील प्रस्तावित 'बिहार भवन'वरून बिहार सरकार आणि मनसेमध्ये वाद

Air India अमेरिकेत बर्फवृष्टी आणि वादळामुळे एअर इंडियाने न्यू यॉर्क आणि न्यूअर्कला जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द केली

अमेरिकेत ८,००० हून अधिक उड्डाणे रद्द, ज्यामुळे व्यापक घबराट पसरली

T20 World Cup आयसीसीने बांगलादेशला आरसा दाखवला; टी२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्यात आले

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments