Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेवर होणार, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (23:20 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार आयोजित करणार . बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांत बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.
 
या घोषणेनंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. याशिवाय शाळांना वेळापत्रकानुसार तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेता येतील, मात्र बोर्डाच्या परीक्षा नियोजित तारखांनाच होतील.
 
4 मार्चपासून परीक्षा सुरू होऊ शकतील
महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 पासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी इयत्ता 10वी, 12वीच्या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले. यावर्षी सुमारे 32 लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2022 मध्ये बसणार आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments