Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

Webdunia
शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (18:56 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या नंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या वृताचे खंडन केले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....<>

06:56 PM, 10th Jan
नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू
महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वर्षाच्या सुरुवातीस 3 रस्ते अपघाताने 5 जणांचा मृत्यू झाला. तिन्ही घटना कोराडी व कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.सविस्तर वाचा..... 
 

05:36 PM, 10th Jan
मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला मुंबईच्या आरे कॉलोनीत या पुढे वृक्षतोड करण्यास परवानगी न देण्याचे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायमूर्ती अभय एस ओका आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, वन प्रशासन अर्जावर प्रक्रिया सुरु करू शकते.नंतर न्यायालयाकडून आदेश मागू शकते 

05:07 PM, 10th Jan
शरद पवार भाजपसोबत जाणार की नाही? पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या नंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या वृताचे खंडन केले आहे.सविस्तर वाचा.....

04:22 PM, 10th Jan
वाल्मिक कराड यांना दिलेल्या ईडीच्या नोटीसवर सुप्रिया-अजित समोरासमोर
बीडच्या मस्साजोग येथे गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..... 

03:41 PM, 10th Jan
भाजपने महाराष्ट्रात सुरु केले 'घर चलो अभियान', दीड कोटी लोकांना भाजपचे सदस्यत्व देणार
1.5 कोटी लोकांना भाजपचे सदस्यत्व देण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात घर चलो अभियान सुरु केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. 

03:13 PM, 10th Jan
महाराष्ट्रातील पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे विजय मिळाले असून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 

02:37 PM, 10th Jan
पालघर येथे फ्लॅटमध्ये परफ्यूमच्या बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट, चार जण जखमी
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात नालासोपारा परिसरात परफ्यूमच्या बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट झाल्याची बातमी आली आहे. फ्लॅटमध्ये परफ्यूमच्या बाटल्यांवर तारखा बदलण्याचे काम चालू होते. या दरम्यान एक स्फोट झाला. सविस्तर वाचा

11:41 AM, 10th Jan
एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना सतत भेटणाऱ्या आदित्य ठाकरेंवर शिंदे यांनी टीका केली आणि ते म्हणाले की, ते मला असंवैधानिक मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना निरुपयोगी म्हणत असत पण ते इतक्या लवकर आपला रंग बदलतील असे वाटत नव्हते.<>

11:32 AM, 10th Jan
जनतेच्या सूचनांवरून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार केला जाईल, नागरिकांकडून मागवले मत
मुंबई महानगरपालिकेने आता अर्थसंकल्पासाठी जनतेकडून सूचना घेण्याची तयारी केली आहे. जेणेकरून महानगरपालिका जनतेच्या मदतीने आपले बजेट ठरवेल, ज्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे. यासाठी तुम्ही अशा सूचना पाठवू शकता. सविस्तर वाचा

10:24 AM, 10th Jan
नागपुरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 440 सायलेन्सरवरून चालवला रोड रोलर
बुलेटच्या सायलेन्सरमधून येणाऱ्या फटाक्यांसारख्या आवाजामुळे उपराजधानीतील सामान्य जनता त्रस्त होत आहे. लोक याबद्दल वाहतूक पोलिसांकडे सतत तक्रारी करत होते. सविस्तर वाचा

10:11 AM, 10th Jan
दिल्लीत काँग्रेस एकटी पडली, उद्धव ठाकरेंनी सपाप्रमाणे केजरीवालांना पाठिंबा दिला
दिल्ली विधानसभा निवडणुका 5  फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण केजरीवाल निवडणूक प्रक्रियेत पुढे जात असताना, काँग्रेस एकाकी पडत चालली आहे आणि आता उद्धव गटानेही त्यांना सोडून दिले आहे. सविस्तर वाचा

10:10 AM, 10th Jan
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: पोलिसांच्या तपासावर जिशान सिद्दीकी नाराज, म्हणाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी मुंबईचे सहआयुक्त यांना भेटण्यासाठी आयुक्त कार्यालयात पोहचले. जिशान सिद्दीकी म्हणतात की त्यांना वाटत नाही की पोलिस तपासाची दिशा योग्य आहे. एसआरएच्या दृष्टिकोनातून काहीही आढळले नाही म्हणून जिशान तपासावर खूश दिसत न्हवते. सविस्तर वाचा

10:08 AM, 10th Jan
मुंबईत अकरावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या
गुरुवारी सकाळी गोरेगाव पूर्व येथील इंटरनॅशनल स्कूलमधील 11 वीच्या विद्यार्थिनीनेआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सविस्तर वाचा

10:06 AM, 10th Jan
शरद पवार म्हणाले शिकण्याची गरज आहे, पक्ष अति उत्साहात बुडाला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला अजूनही पराभव पचवता आलेला नाही आणि तो काय कमी पडला याचा विचार करत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच दोन दिवसांची आढावा बैठक घेतली, ज्याचा सारांश शरद पवार यांनी दिला. सविस्तर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत, एचएस प्रणॉयचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपला

2024 मध्ये संजू सॅमसनने धमाल केली, 2025 मध्येही त्याची जादू अशीच सुरू राहील का?

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments