Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सज्ज, शिवसेनायूबीटी एकला चलोच्या मार्गावर

Webdunia
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (21:40 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव स्वतः बैठक घेत आहेत.
 
 राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....    

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या पक्षाने 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
 

गुरुवारी रात्री उशिरा देशाने एक चमकणारा तारा गमावला. भारताचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान आणि महान अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92  व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सविस्तर वाचा

देशातील दिग्गज राजकारणी डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून प्रत्येक राजकारणी देशाची हानी झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या वेळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, मग ते पक्ष असोत वा विरोधक, सर्वच शोक व्यक्त करत आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. सविस्तर वाचा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, भारतातील ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्थानिक लोक स्वतःवर राज्य करण्यास अयोग्य असल्याचा संदेश देण्यासाठी देशाचा इतिहास विकृत केला.  सविस्तर वाचा 

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी हिने सुपारी देऊन हत्या केली अशी बातमी समोर आली आहे. मोहिनीचे अक्षय जवळकर या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सतीश वाघ यांना हा प्रकार कळला. पोलिसांनी मोहिनी, अक्षय आणि हत्या करणाऱ्यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा 

मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या नोकरासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दागिने आणि वाहनांसह एकूण 8 लाखाहून अधिकचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सविस्तर वाचा... 

काल गुरुवारी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर एनसीपी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ते एक असामान्य व्यक्ती होते.  संसदेत अनेकदा त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ते एक अद्भुत माणूस आणि सर्वोत्कृष्ट जागतिक नेत्यांपैकी एक होते.
सविस्तर वाचा... 

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोक विविध डावपेचांचा अवलंब करत असतात. या साठी काही जण बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. ठाण्यातून या बाबतचे एक प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सविस्तर वाचा... 

आता महाराष्ट्रात आणखी एका सरपंचावर हल्ला झाला आहे.धाराशिव जिल्ह्यात चार जणांनी सरपंचाच्या गाडीची काच फोडली. तसेच पेट्रोलने भरलेले कंडोम कारमध्ये फेकून दिला. या हल्ल्यात सरपंचासह एक जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी सदर माहिती दिली. 
सविस्तर वाचा... 

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांनी 10 वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले त्यांनी अर्थतज्ञ आणि राज्यपाल म्हणून देखील देशाची सेवा केली आहे.
सविस्तर वाचा... 

नागपुरात एका 45 वर्षीय शिकवणी शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना वर्गमित्राला पेन ने दुखापत करायला सांगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना वर्गमित्राला पेन ने टोचण्यासाठी बाध्य करत होता. ही घटना मंगळवारी शिकवणी दरम्यान घडली.सविस्तर वाचा... 
 

मुंबईतील मरोळ परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारी 25 वर्षीय पायलट सृष्टी तुली 25 नोव्हेंबरला सकाळी मृतावस्थेत आढळली. एका दिवसानंतर, पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित (27) याला अटक केली आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या महिन्यात आत्महत्या केलेल्या एअर इंडियाच्या पायलटचा तुरुंगात असलेला प्रियकर आदित्य पंडित याला मुंबई न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
सविस्तर वाचा... 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची (UBT) निराशाजनक कामगिरी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (UBT) एकट्याने जाण्याचा विचार करत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एकला चलो (स्वबळावर) निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सविस्तर वाचा... 

महाराष्ट्र सरकारने 2025 सालच्या सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. 4 डिसेंबर 2024 (बुधवार) रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सुटी जाहीर करण्यात आली. 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 25 द्वारे अधिकृत केल्यानुसार, या सुट्ट्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरातील विशिष्ट दिवशी सुट्टी देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. सविस्तर वाचा... 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारने 2025 साठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले

LIVE: शिवसेना यूबीटीच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज,विजय वडेट्टीवार यांनी केली मागणी

शिवसेना यूबीटीच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज, विजय वडेट्टीवार यांनी केली मागणी

एअर इंडियाच्या पायलटच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला दिलासा,जामीन मंजूर

रजनीकांत यांनी डी गुकेशची भेट घेतली

पुढील लेख