Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

11.19 कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (14:49 IST)
50.88 कोटींची खरेदी दाखवून 11.19 कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे. जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल, (42), घाटकोपर यांना मंगळवार दि. 14 रोजी अटक केली.  अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर, संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे, नामदेव मानकर सहभागी झाले होते.
 
 महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 19 जणांना अटक केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

पुढील लेख
Show comments