Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करा

Webdunia
शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (22:31 IST)
हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी 27 एप्रिल, 2021 रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोना स्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 13 एप्रिल, 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र. 1,2,7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. कोरोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Bank Holidays: बँका फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बंद राहतील, सुट्ट्यांची यादी जाणून घ्या

LIVE: दिवा रेल्वे स्थानकावर विजेचा धक्का लागून दोन कामगार भाजले

महायुती सरकारमधील 65 टक्के मंत्री कलंकित असल्याचा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मोठा दावा

चेंबूरमध्ये मेट्रोचा बांधकाम सुरूअसलेला खांब कोसळला,सुदैवाने जनहानी नाही

ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर विजेचा धक्का लागून दोन कामगार भाजले

पुढील लेख
Show comments