Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समाविष्ट नाही , सुनावणी पुन्हा लांबणीवर

uddhav shinde
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (08:00 IST)
सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राचे कामकाज आजसाठी समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी आज 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता देखील अद्याप दिसत नाही. क्वचितच वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे सुनावणी आज होणार नसल्याची वकिलांमध्ये चर्चा आहे. या आधी 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती. त्यानंतर ती पुढे जाऊन मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आज ही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.
 
या आधी राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता चौथ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे. सरन्यायाधीश एस व्ही रमणा  हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या सुनावणी बाबत अद्याप अनिश्चितता असल्याने सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कारकीर्दीत याचा निकाल लागेल ही आशा आता मावळत चालली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ZIM: काळा चष्मा घालून संघासोबत गब्बरने केले नृत्य, झिम्बाब्वेवर क्लीन स्वीपला असे केले सेलिब्रेट