संस्थेद्वारे (एफएसआय) तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 या अहवालाचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज प्रकाशन केले. देशातील वन आणि वृक्षसंपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये मध्य प्रदेशने पहिला क्रांक पटकावला आहे. तर, महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष जाहीर करताना मंत्र्यांनी दिली.
सध्या केलेल्या मूल्यांकनातून 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असल्याचे समोर आले आहे ,याबद्दल मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.आणि ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लक्ष केवळ वनांचे संख्यात्मक संवर्धन करण्यावरच नाही तर वनांना गुणात्मकदृष्ट्या समृद्ध करणे हे देखील आहे.
क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार वनाच्छादीत क्षेत्राच्या बाबतीत, मिझोरम (84.53%), अरुणाचल प्रदेश (79.33%), मेघालय (76.00%), मणिपूर (74.34%) आणि नागालँड (73.90%) ही पहिली पाच राज्य आहेत.
देशातील खारफुटीचे आच्छादन असलेले एकूण क्षेत्र 4,992 चौरस किमी आहे.मागील 2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रात 17 चौरस किमीची वाढ दिसून आली आहे. ओदिशा (8 चौरस किमी) त्यानंतर महाराष्ट्र (4 चौरस किमी) आणि कर्नाटक (3 चौरस किमी) ही खारफुटीच्या आच्छादनामध्ये वाढ दर्शवणारी पहिली तीन राज्य आहेत.
संपूर्ण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध आहे: