Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१’ मध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय क्रमांकावर

Webdunia
सोमवार, 27 डिसेंबर 2021 (22:39 IST)
कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी पायाभूत सुविधा  आणि समाज कल्याण व विकास या क्षेत्रांमध्ये विविध 58 मानकांवर सरस ठरत महाराष्ट्र राज्याने केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१ ’ मध्ये संयुक्त श्रेणीत द्वितीय स्थान मिळविले आहे.
 
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या  प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार निवारण विभागाच्यावतीने ‘सुशासन निर्देशांक अहवाल 2021’ तयार करण्यात आला असून नुकतेच केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‍हा  निर्देशांक जाहिर करण्यात आला.
 
महाराष्ट्राने या अहवालात ५.४२५  गुणांसह दुसरे स्थान मिळविले असून राज्याच्या समग्र प्रशासनात सकारात्मक बदल होत असल्याचे या अहवालात दिसून येते. एकूण १० क्षेत्रांमध्ये ५८ मानकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्राने  कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी पायाभूत सुविधा  आणि समाज कल्याण व विकास या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
 
‘सुशासन निर्देशांक अहवाल 2021’ मध्ये सहभागी देशातील सर्व राज्यांपैकी 20 राज्यांनी गुणांकनाच्या बाबतीत सुधारणा केली  आहे. यात गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

गरीब कुटुंबात जन्माला येऊनही पंतप्रधान मोदींनी कधीही नकारात्मकता बाळगली नाही म्हणाले अमित शहा

LIVE: Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार

रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर, केंद्रीय मंत्र्यांनी रस्ते अपघातांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली

Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आली समोर

पुढील लेख
Show comments