Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य तयार

Webdunia
मंगळवार, 2 जून 2020 (09:47 IST)
किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता, एनडीआरएफ तुकड्याही तैनात
 
निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध  
मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.   
 
एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात  
या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहे

Penguins Divorce जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पेंग्विनचा घटस्फोट

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची गाडी तलावात मिळाली, आत दोरीने बांधलेला मृतदेह आढळला

उद्योग आणि व्यवसाय जगताच्या अपेक्षा वाढल्या, दीपेन अग्रवाल म्हणाले- प्रगतीशील आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाची गरज

पुढील लेख
Show comments