Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका

maharashtra-st-bus-strike-heart-attack-to-the-protesting-employee
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (21:40 IST)
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन  20 दिवसांनंतरही सुरुच आहे.  त्यातच आता आंदोलनाला बसलेल्या एका कर्मचाऱ्याला हृद्यविकाराचा झटका आला  आहे. पुण्यातील शिवाजीनगर स्थानकात आंदोलनाला बसलेल्या वाहकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एसटी महामंडळाकडून निलंबनाची नोटीस पोस्टाने पाठवण्यात आली होती.
 
मारुती घडसिंग असं या वाहकाचं नाव असून सेवा समाप्तीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून धानोरी परिसरामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार  आहे.  
 
निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास बंद