Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र : पुणे आणि नाशिकमध्ये दोन मोठे अपघात, 4 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (09:23 IST)
महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दोन मोठे भीषण अपघात झाले आहे. या भीषण अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील अहमदनगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. तर नाशिकच्या दिंडोरी रोडवर बस आणि कारची भीषण टक्कर झाली. अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.
 
तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी रोडवरील आकरळे जंक्शनजवळ बस आणि कारमध्ये भीषण धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत बस आणि कार जळून खाक झाली होती. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावर लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला, यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचली. दोन्ही अपघातांची चौकशी पोलीस करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

iPhone 16:भारतात iPhone 16 विक्री सुरू होताच दुकानाबाहेर लांबच लांब रांगा

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, दिल्लीच्या 3 पोलिस ठाण्यात भाजपची तक्रार दाखल

पुण्यातून पुणे दुबई आणि पुणे बँकॉक विमानसेवा लवकर सुरु होणार

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी तब्बल 300 मोबाईल चोरले

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेला उशीर झाल्याबद्दल संजय राऊत काँग्रेसवर नाराज

पुढील लेख
Show comments