Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेटरने बिलाचे पैसे मागितले म्हणून त्याला कारमधून 1 किमीपर्यंत ओढत नेले

Webdunia
गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (10:39 IST)
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे जेवणाचे बिल भरण्यास सांगितल्यावर काही लोकांनी एका वेटरला कारमधून एक किलोमीटरहून अधिक लांब ओढले. आरोपींनी नंतर वेटरला मारहाण करून त्याचे पैसे हिसकावून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील मेहकर-पंढरपूर महामार्गावर शनिवारी ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला आलेले तिघेजण पैसे न देता पळून जाऊ लागले तेव्हा वेटरने कारचा दरवाजा उघडून आरोपी ग्राहकांना जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी थांबले नाही उलट कारचा वेग वाढवून वेटरला खेचून घेऊन गेले.
 
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तिघांनी हॉटेलबाहेर पांढऱ्या रंगाची कार पार्क केली आणि हॉटेलमध्ये जेवण केले, असे सांगितले जात आहे. यानंतर तिघेही लोक त्यांच्या कारमध्ये आले आणि जेव्हा वेटरने पैसे मागितले तेव्हा त्यांनी यूपीआय क्यूआर कोड स्कॅनर आणण्यास सांगितले. वेटर त्यांच्या गाडीजवळ आल्यावर तिघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर तिघेही तेथून कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान वेटरने कारचा दरवाजा उघडला, पण आरोपीने पटकन कार उलटवून पळ काढला. वेटरने कारचा दरवाजा दाबून ठेवला, व त्याला लांबपर्यंत ओढले गेले. दुसऱ्या व्यक्तीने देखील कार थांबविण्याचा प्रयत्न केला, कारवर वीट फेकली परंतु कार वेगात निघून गेली.
 
पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी वेटरला रात्रभर ओलीस ठेवले. त्यांनी त्याला निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली आणि त्याच्या खिशातील 11,500 रुपये हिसकावले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने शनिवारी रात्री वेटरला कारमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धमकी देऊन सोडून दिले. वेटर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments