Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर भक्कम होत आहे : शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (21:32 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील  मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचे ससेमीरा लागला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी भाष्य करताना ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर भक्कम होत आहे, असं प्रतिपादन केलं. तसंच, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला. तसंच, आम्ही १०० टक्के हे सरकार चालवणार आणि पुन्हा कसं सत्तेवर येईल हे देखील बघणार, असं शरद पवार म्हणाले.
 
महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्याविरोधात ईडीच्या केसेस सुरू आहेत, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केस आहे, भावना गवळींवर आरोप झालेत, तिथेही छापे मारण्यात आले आहेत, त्यामुळे सरकार अस्थिर होईल असं वाटतं का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना अजिबात सरकार अस्थिर होणार नाही. उलट यामुळे सरकार आणखी भक्कम व्हायला लागलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
 
ईडीच्या कारवायांमुळे सरकारमध्ये एकसंघत्व यायला लागलं आहे. कुणी आपल्याला टार्गेट करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण एक झालं पाहिजे ही भावना आता निर्माण झाली आहे. ही सगळी प्रकरणं राजकीय आकसाने केली जातात. तेच या प्रकरणांमध्ये आपल्याला दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 30 जागांवर उमेदवार जाहीर केले

LIVE: अजित पवार यांचे दिल्ली विधानसभा निवडणुकीत 30 जागांवर उमेदवार जाहीर

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, कृषी साहित्यात 50 कोटींचा गंडा?महायुती सरकारला स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पवार कुटुंबात काका-पुतणे एकाच मंचावर, पण एकत्र बसण्यासही नकार

रशियन सैन्यात लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता

पुढील लेख
Show comments