Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महावितरणचे कर्मचारी आक्रमक, बुधवारपासून तीन दिवस संपाची हाक

bijali
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:59 IST)
मुंबई उपनगरात अदानी या खासगी कंपनीला वीज पुरवठ्यासाठी परवाना देऊ नये, या मागणीसाठी महावितरणचे कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी  बुधवारपासून तीन दिवस संपाची हाक दिली आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांनी महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात  महावितरणचे दीड लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
महावितरण कंपनीला चांगला महसूल मिळणाऱ्या भागात अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येणार आहे. तसेच महापारेषण आणि महाजनको या दोन कंपन्यांमध्येसुद्धा खासगीकरण करण्यात येणार आहे. या कंपन्यांची उभारणी जनतेसाठी केली असून, या कंपन्या जनतेच्या मालकीचा राहाव्यात, अशी भूमिका संघटनांनी बैठकीत मांडली. ऊर्जा खात्याच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून घेत सरकार संघटनेच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले मात्र, त्यावर संघटनांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संघटना संपावर ठाम असून या संपात उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, प्रशिक्षणार्थी अभियंते, अप्रेंटिस आणि  ग्रामविद्युत सहाय्यक सहभागी होणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, नालासोपाऱ्यात जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू