Marathi Biodata Maker

महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात, २ ठार तर ३ गंभीर जखमी

Webdunia
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (08:53 IST)
नाशिक : नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली.
 
वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१) मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा. करवड ता. जि.संभाजीनगर) गंभीर जखमी झाले आहेत. वावी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना समृद्धी महामार्गाकडील रुग्णवाहिकेने औषधोपचारांसाठी सिन्नर व नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

सीएसकेने रवींद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात संजू सॅमसनला विकत घेतले

वसईमध्ये शाळेत दहा मिनिटे उशिरा आल्याने शिक्षकाने विद्यार्थिनीला शिक्षा केली, मुलीचा मृत्यू

पार्थ पवार जमीन वादात विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले, केली ही मागणी

लालूंची मुलगी रोहिणी आचार्य राजकारणातून निवृत्त, कुटुंबाशीही संबंध तोडले

LIVE: लोकशाही १०,००० रुपयांना विकली जाते, हे बिहारमध्ये दिसते, संजय राऊत यांचा टोमणा

पुढील लेख
Show comments