suvichar

मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:11 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रुपाली पाटील  यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहेत. पोलिसांनी साताऱ्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एक जोगता असून भिक्षा मागून आपली गुजराण करतो. 
 
काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना हा धमकीचा फोन आला होता. ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस’, अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती. यानंतर रुपाली पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली होती. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले होते.
 
तेव्हापासून खडक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी रुपाली पाटील यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशील जमवण्यास सुरुवात केली. हा तपशील आल्यानंतर पोलिसांना शितोळे याच्या पहिल्या पत्नीचा शोध लागला. तिच्याकडून पोलिसांना मोहन शितोळेचे आणखी पाच-सहा मोबाईल क्रमांक मिळाले. यापैकी एका मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरुन पोलिसांनी मोहन शितोळे याला कराडच्या ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: NEET पेपरफुटी: पुण्यात मोटेगावकर यांचे RCC कोचिंग सेंटर बुलडोझरने पाडले

कॅनडात गँगस्टर बिश्नोई गँगचा थरार? 'क्रिकेट कॅनडा'चे अध्यक्ष अरविंद खोसला यांच्या घरावर भरदिवसा गोळीबार

Crocodile Attack सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाला सरयू नदीत मगरीने ओढले; शोध सुरू

टाटाचा धमाका! २८ मेला येतेय नवी Tiago; लीक झाले 'हे' भन्नाट फीचर्स, किंमत किती असणार?

NEET पेपर ५० लाखांपर्यंत विकला गेला; ब्लँक चेक स्वीकारले, पालकांना दिली जात होती गांरटी

पुढील लेख
Show comments