Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्लॅटीनमच्या खाणीच्या कंत्राटासाठी मणिपूर जळतोय; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:33 IST)
ईशान्येकडील राज्यातील प्लॅटिनम खाणकामाचे कंत्राट गौतम अदानींना देण्यासाठी मणिपूरमधील हिंसाचाराला सत्ताधारी भाजपकडून जाणीवपूर्वक उत्तेजन दिले जात खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
 
बुधवारी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “गेल्या काही दिवसापुर्वी मणिपूरमध्ये प्लॅटिनमचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा आदिवासी कुकी समुदायाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये सापडला आहे. सरकारला प्लॅटिनम खाण हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती मित्र अदानी यांना द्यायचा आहे. मणिपूरमध्ये चाललेला हा प्रकार त्या खाणकामाचे टेंडर अदानी यांच्या गळ्यात टाकण्यासाठीचा डाव आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला.
 
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “खाणकामाला परवानगी देण्याचा अधिकार आदिवासी हिल कौन्सिलला नाही. तो अधिकार मणिपूर विधानसभेला आहे. तर आदिवासी हिल कौन्सिलने या प्लॅटिनम खाणीचे कंत्राट खाजगी संस्थेला देण्यास तीव्र विरोध केला आहे. तसेच जर खाणीचे कंत्राट भारत सरकार स्वत:कडे ठेवत असेल तर अदिवासी कौन्सील स्वेच्छेने जमीनी रिकाम्या करून देऊन सरकारला पाठिंबा देतील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, खाणकामाचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिल्यास त्याचा तिव्र विरोध केला जाईल,” असा दावाही त्यांनी केला.
 
शेवटी बोलताना VBA अध्यक्ष म्हणाले, “खासगी कंपन्यांसाठी खाण हक्कांना कुकी जमातीने तीव्र विरोध केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने कुकिंचा प्रतिकार रोखण्यासाठी, आसाम आणि मणिपूरच्या सीमेवरील मैदानी भागात राहणार्‍या मैतईं या समुदायाच्या आदिवासी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments