या प्रकरणात साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलं आहे. त्यांनी सोशल ग्रुपवर साठे यांनी ‘आता तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का?’ अशी पोस्ट टाकली.
यामध्ये त्या म्हणतात की आपण जेलकर्मी अधिकारी, कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ, त्यांना सांभाळून घेवू , तर या विरोधात ठाणे जेलचे निलंबित जेलर हिरालाल जाधव यांनी तक्रार दिली आहे. आरोपींच्या मदतीसाठी पैसे गोळा केल्याचा आरोप साठेंवर केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीना शिक्षा होते का नाही हे सुद्धा पहावे लागणार आहे.