Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमाड : काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक

crime
, मंगळवार, 21 मार्च 2023 (08:22 IST)
मनमाड ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविले जात असताना, मनमाड शहरातील एका विद्यालयात कॉपी करू न दिल्यामुळे दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थांच्या गर्दीत शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना  घडली. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शिक्षक नीलेश दिनकर जाधव (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. नीलेश जाधव हे छत्रे विद्यालयातील कला शिक्षक असून, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. सध्या इयत्ता दहावीचे पेपर सुरू असल्याने नीलेश जाधव यांना येथील एच.ए.के हायस्कूलमध्ये बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपविण्यात आले होते. पेपर सुटल्यानंतर सुपरपव्हिजन संपवून नीलेश जाधव हे बाहेर पडत असताना, विद्यार्थ्यांमधून काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली.त्यांच्या डोक्याला मार लागला असून ते जखमी झाले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातारा :झोका खेळताना नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू