Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'त्या' 6 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, मनसेची याचिका

'त्या'  6 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, मनसेची याचिका
, शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:09 IST)

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत 6 नगरसवेकांच्या नवीन गटाला मान्यता दिली जाणार नसल्याचं कोकण भवन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ६ नगरसेवक अधिकृतरित्या मनसेचेच राहतील असा दावा मनसेनं केला आहे. दरम्यान, कोकण भवन आयुक्तांनी ही याचिका दाखल करुन घेतल्यानं शिवसेनेला मात्र, मोठा धक्का बसला आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भयंकर : 'तिने' ११ वर्षाच्या मुलावर सेक्सची केली जबरदस्ती