rashifal-2026

यंदा पाऊस चार दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार

Webdunia
शनिवार, 19 मे 2018 (09:22 IST)
यंदा मान्सून २९ मे ला  केरळात धडकणार असून महाराष्ट्रासाठी त्याने ५ जूनचा वायदा दिलेला आहे. ५ जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीसह मुंबई व्यापेल. म्हणजेच यंदा पाऊस चार दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.  केरळात आगमन झाल्यानंतर मान्सून ५ जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि १० जून रोजी मुंबईसह राज्यभरात आपले हातपाय पसरेल असा अंदाज आहे. 
 

अरबी समुद्रात तयार झालेले वादळ ओमानकडे सरकले नसते तर मान्सूनचा वेग वाढला असता आणि तो २८ मेअगोदरच केरळमध्ये दाखल झाला असता. त्यानंतर तो महाराष्ट्रात वेळेच्या बराच आधी दाखल झाला असता अशी माहिती हवामान विभागाचे वरीष्ठ वैज्ञानिक ए.के.श्रीवास्तव यांनी दिली.

याआधी हवामान आणि कृषीतज्ञांनी मान्सून२८ मे रोजी केरळात दाखल होईल आणि तीन दिवस आधी म्हणजेच ४ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच मान्सून ३ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार होता. परंतु,आता मान्सून ४ दिवस आधी म्हणजेच ५ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.
मान्सूनचे बदललेले वेळापत्रक
अंदमान – २० मे
केरळ – २९ मे
कोकण किनारपट्टी – ५ जून 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ऐकले नाही तर तुम्हाला मादुरोपेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील', ट्रम्पने दिली धमकी

5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस इतिहास, महत्व जाणून घ्या

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इंडियन सुपर लीग हंगामाची घोषणा केली

LIVE: उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

पुढील लेख
Show comments