Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनेकांनी माझी पतंग कापण्याचा प्रयत्न केला, अजूनही ते सुरू आहेत : भुजबळ

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:53 IST)
नाशिकमकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला.आज रह्त्र्वक़्दिचे नेते व पालकमंत्री भुजबळ येवला येथे दौऱ्यावर होते,   यावेळी उत्सव साजरा करत असतांना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजवर अनेकांनी माझी पतंग कापण्याचा प्रयत्न केला आहे.अजूनही तसे प्रयत्न सुरू आहेत. मी मात्र कदीही कुणाची पतंग कापली नाही किंवा तसे धंदाही करत नाही. तरीही माझ्या पतंगीवर अनेकांचे लक्ष असते, अशी प्रतिक्रीया अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांनी शनिवारी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात विकास कामांच्या उद्घाटन  केले. यावेळी आपण कर्ज बुडवलं की केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग अदानी-अंबानींकडून कोणतीही सबसिडी मिळणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला. 
 
यावेळी ते म्हणाले की, वीजेसाठी म्हणून नाशिक जिल्ह्याकरिता 35 कोटी रुपये काढून ठेवले आहेत. त्यामुळे येथून पुढे आपल्याला छोट्या-मोठ्या कामासाठी कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपले वीजमंत्री केंद्रासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात प्रश्न मांडणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
भुजबळ पुढे म्हणाले की, सध्या महावितरणवर 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज बुडाले की, नेहमीप्रमाणे आपले केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग त्यावेळी अदानी – अंबानींकडे तुम्हाला कोणतीही सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे ही वीज कंपनी वाचवणे आपले कर्तव्य आहे. ज्यामुळे कोणत्याही अदानी-अंबानींच्या ताब्यात ही कंपनी जाणार नाही. ती त्यांच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल.शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच वीज देखील खंडीत होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विजबिलाच्या भरणातून आलेला निधी हा गावातील विजेची कामे मार्गी लावण्यासाठी परत मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments