Festival Posters

मराठा आरक्षणावर आजपासून उच्च न्यायालयात सुनावणी

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (09:22 IST)
२७ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अख्या राज्याचे लक्ष असलेल्या मराठा आरक्षण्चा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायलयाने लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. त्यामुळे आज २७  फेब्रुवारीपासून याची दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.
 
उद्यापासून कोर्ट रुम ५२ मध्ये याची दैनंदिन सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर  ७  डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यापुढील सुनावणीला उद्या  २७  फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ८० टक्क्यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिज्ञापत्र सरकारने गेल्या वेळच्या सुनावणीत सादर केले होते.कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावाही सरकारने केला होता. त्यामुळे यापुढील सुनावणीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: बदलापूरमध्ये, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजप नेत्याचा मुलगा सनी पाटील याला मारहाण केली

सोमनाथ अमृत महोत्सवात पोहोचले PM मोदी

वाहन खोल दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू

प्रेम, कट आणि विजेचा धक्का; जेव्हा नवरा प्रेमात अडथळा बनला, तेव्हा पत्नीने प्रियकराला सोबत घेऊन रचला भयंकर हत्येचा कट

PBKS vs DC: आजचा आयपीएल सामना कोण जिंकणार? पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जाणार

पुढील लेख
Show comments