Festival Posters

मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन, एकाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 23 जुलै 2018 (16:48 IST)
औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारली. सदरची  घटना सोमवारी दुपारी घडली. काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे या तरुणाचे नाव असून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.
 
गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी दुपारी  कायगाव टोक येथील नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा जलसमाधी घेऊ, असे त्याने उडी मारण्यापूर्वी म्हटले होते. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी कारवाई, २६ कार्यकर्त्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

LIVE: महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

लाडकी बहीण योजना: कारवाई सुरू, आता पई पई वापस करावे लागतील

मुस्लिम समाजात अन्नात थुंकण्यामागील तर्क काय? खरंच अशी परंपरा आहे का?

पुढील लेख
Show comments