Marathi Biodata Maker

वर्ध्याच्या इवोनिथ स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 जणांची प्रकृती चिंताजनक

Webdunia
गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (08:03 IST)
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील इवोनिथ स्टील प्लांटच्या भट्टीत भीषण स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी  घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर आगीत सुमारे 15 मजूर होळपले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी इवोनिथ स्टील प्लांटच्या भट्टीतही असाच स्फोट झाला होता. यामध्ये तीन ते चार कामगार भाजले. या घटनेनंतर ही भट्टी बंद करण्यात आली. त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले.  
 
तसेच बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे सुमारे 20 कामगार येथे काम करत होते. त्यानंतर अचानक भट्टीत स्फोट झाला.सूचना मिळताच तात्काळ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.तसेच सावंगी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्फोटामुळे भाजलेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुणे : मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या मृत्यू प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले

भारतात प्लास्टिकच्या नोटा येणार

LIVE: गडचिरोलीत पोलिसांनी घनदाट जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी शस्त्रनिर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

परदेशातून आलेल्या व्यावसायिकात इबोलाची लक्षणे आढळल्याने खळबळ; अहमदाबादमध्ये ४ जण क्वारंटाईन

पुढील लेख
Show comments