Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालाड परिसरातील अप्पा पाडा झोपडपट्टीला भीषण आग

Webdunia
सोमवार, 13 मार्च 2023 (23:41 IST)
मुंबईतील मालाड परिसरातील अप्पा पाडा झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागली. या घटनेत 15 ते 20 एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचेही वृत्त आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. 12 मोटरपंपाच्या 10 लाईन घटनास्थळी पोहोचल्या होत्या. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. झोपडपट्टीत लागलेली आग लेव्हल 3 ची असल्याचे सांगण्यात आले. 
 
 
15-20 एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी 12 मोटर पंपांच्या 10 लाईन घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावरून एक मृतदेह सापडला आहे. त्याला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या कुलिंग प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी मुंबईतील ओशिवरा परिसरातील बाजारपेठेत आग लागल्याची बातमी समोर आली होती, जी मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील ओशिवरा येथील एका फर्निचर मार्केटमध्ये लागली होती.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments