Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा माथेरानची राणी रुळावर

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:11 IST)

माथेरानची राणी   अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. 

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक पर्वणीच होती. मात्र जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या. दोन घटना तर रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा मे २०१६ पासून बंदच ठेवण्यात आली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने केलेल्या सुरक्षा उपाययोजनांपैकी नेरळ ते माथेरानपर्यंत संरक्षक भिंतीचे तसेच रुळांचे काम हाती घेण्यात आले. यातील अमन लॉज ते माथेरानपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या दरम्यानची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पहिल्या टप्प्यातील निकालावर संजय राऊत संतापले

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Bye-Election Result 2024 Updates वायनाडमध्ये प्रियंका आघाडीवर

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांच्या निकालांवर देशाची राजकीय दिशा अवलंबून असणार

LIVE: पहिल्या टप्प्यातील निकालावर संजय राऊत संतापले

पुढील लेख
Show comments