राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी केली होती. आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी होऊ लागली असून या मागणीला जोर धरत आहे. आज अजित दादांच्या घरी काही आमदार आणि नेत्याची बैठक सुरु असून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरदपवार यांनी नगरचा आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील दौरा रद्द केला.
आज सकाळी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, दौलत दरोडा, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे बडे नेते उपस्थित होते. सध्या अजित दादा नाराज असल्याच्या पार्श्ववभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष केले असून अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी पक्ष सांघटनेत पद देण्याची मागणी केली. नंतर अजित दादा यांना पक्ष प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी होऊ लागली. आज अजित पवार यांच्या घरी बैठक सुरु असून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्याचे सांगितले जात आहे.