Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

19 मे रोजी इंजिनिअरिंग सीईटी

19 मे रोजी इंजिनिअरिंग सीईटी
पुणे , मंगळवार, 2 जानेवारी 2018 (11:45 IST)
राज्यातील येत्या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या सुरूवातीलाच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या सीईटीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे.
 
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी दि. 19 मे रोजी होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात एमबीए, एमसीए, एलएलबी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, इंटिग्रेडेट कोर्सेसचा समावेश होता. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलमार्फत घेतली जाते. या परीक्षा सेलने आज व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत, अशी माहिती परीक्षा सेलचे आयुत ए. ई. रायते यांनी दिली.
 
दरम्यान, सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची सीईटी कोणत्या तारखेला होणार आहे, त्याची माहिती पाच महिन्यांपूर्वीच परीक्षा सेलने प्रसिद्ध केले, ही बाब स्वागतार्ह म्हणावे लागेल.  
 
अभ्यासक्रम व सीईटी तारखा अनुक्रमे : एमबीए, एमएम सीईटी-10 व 11 मार्च, एमसीए सीईटी-24 मार्च, पाचवर्षीय एलएलबी- 22 एप्रिल रोजी, एमएचटी-सीईटी -10 मे, बॅचरल ऑफ फाईन आर्टस्‌-13 मे, मास्टर ऑफ आर्किटेक्‍चर-20 मे, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी- 20 मे, मास्टर ऑफ एज्युकेशन-25 मे, बॅचरल ऑफ फिजीकल एज्युकेशन- 1 ते 3 जून, तीन वर्षीय पदवी लॉ-17 जून, बॅचरल ऑफ एज्युकेशन-1 ते 10 जून, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन- 11 व 12 जून.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विदर्भाला पहिलेच रणजी विजेतेपद