suvichar

MHT CET 2019 परीक्षा आजपासून सुरु, उमेदावारासाठी आवश्यक कागदपत्रे

Webdunia
राज्याचा सामायिक प्रवेश परीक्षा सेल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक सीईटी परीक्षेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात एकूण 3 लाख 96 हजार परीक्षार्थी या परिक्षेला बसणार आहे. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षा देतील.
 
या परीक्षा महाराष्ट्रभर होत असून, त्या २ ते १३ मे या कालावधीत पार पडणार आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये या परीक्षा पार पडणार असून दररोज दोन सत्र अशा पद्धतीने या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
महत्त्वाची माहिती 
विहित वेळेत उमेदवारांनी केंद्रावर पोहचावे.
परीक्षा केंद्रावर दाखल होताना परीक्षार्थींकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. 
प्रमाणपत्र वैध असेल तसेच मूळ कागदपत्रांवरील उमेदवाराचे छायाचित्र आणि त्याच्या स्वाक्षरी वैध ठरणार आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्याने भरलेल्या ऑनलाईन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता भरताना काही चुका झाल्या असतील, त्याबाबत विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाऊन हमीपत्र भरून देण्याची सूचनाही विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. 
 
 
उमेदावारासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड/ ई-आधार कार्ड, पॅन कार्ड भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
मतदार ओळखपत्र फोटोसह
बँक पासबुक, उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर गॅझेटेड ऑफिसरने जारी केलेला फोटो
ओळख पुरावा (उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर लोक प्रतिनिधींनी जारी केलेला फोटो),
उमेदवाराला मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयाद्वारे जारी केलेले अलीकडील ओळखपत्र (तारखेनुसार वैध 2018-19)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

मुंबई बुलडोझर कारवाई : वांद्रे दंगलीप्रकरणी १० जणांविरुद्ध एफआयआर

LIVE: फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय जाहीर केले; जूनपासून कर्जमाफी सुरू होणार

चारधाम यात्रेत भाविकांचा महापूर

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

पुढील लेख