Publish Date: Wed, 25 Nov 2020 (16:55 IST)
Updated Date: Wed, 25 Nov 2020 (17:09 IST)
आमदार प्रताप सरनाईक मंगळवारी बाहेर गावावरून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. होम क्वारंटाईन असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीकरता बोलावले असताना उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे पुढील आठवड्यात प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना एकत्र चौकशीसाठी बोलवावे अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडी अधिकाऱ्यांना केली आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. प्रताप सरनाईक यांना बोलावण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाईन असल्यामुळे ते गेले नाहीत. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. विहंगला ही पुन्हा चौकशीला बोलावले आहे.