rashifal-2026

आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2024 (09:12 IST)
उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलेले पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रवींद्र वायकर हे  आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
 
मागील काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता.  जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा आरोप होता.
 
दरम्यान, ईडी चौकशीमुळेच रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात होता.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments