Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार आपल्या गावी’ अभियानाची पाचोरा तालुक्यात होणार सुरुवात

Webdunia
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (08:18 IST)
भडगाव तालुक्यात आमदार आपल्या गावी हे अभियान यशस्वीपणे राबवल्यानंतर पाचोरा तालुक्यात देखील हे अभियान लवकरच राबवले जाणार असल्याने त्याची पूर्व तयारीसाठी  आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.
 
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी कोरोनासह सर्वच विभागाच्या कामांचा आढावा घेतला.महावितरणची वीज जोडणी, वसुली, पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन आदी कामाचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करणे, पोखरा योजनेची रखडलेली कामे त्वरित सुरू करणे, घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, अतिक्रमित घरे नावावर करणे बाबत त्वरित मोजणी सुरू करणे, जवाहर विहिरिंचे विषय सोडवणे, तालुक्यातील नागरिकांना  रेशन धान्याचा लाभ देण्यासाठी इष्टांक वाढवणे, नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, जलजीवन मिशनची कामे प्रस्तावित करणे अशा अनेक कामांचा त्यांनी अधीकाऱ्यांकडून आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.
 
तसेच जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने एकदिलाने काम करून अधिकाऱ्यांमधील परस्पर संवाद वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments