Dharma Sangrah

किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार?- राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (14:56 IST)
तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.
 
जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
 
गोल्फ, टेनिस इतकं फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्या खेळात नाही पण ते सुद्धा बंद आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं. “बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगत सुरु करा, राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितला पण राज्य तयार नव्हतं. राज्याला वेगळी अकक्ला आहे का ?” असा सवाल त्यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची अचानक बदली

कुटुंबाला काठ्या आणि बेसबॉल बॅटने मारहाण केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी टीएमसी खासदार युसूफ पठाण यांच्या सासऱ्यांवर आणि मेहुण्यावर केली कारवाई

गुजरातच्या दाहोदमध्ये लग्नसमारंभातील जेवणानंतर अचानक ४०० जण आजारी पडले

मुंबई वृक्ष संजीवनी अभियान: BMC तर्फे शहरातील झाडांच्या संरक्षणासाठी 'वृक्ष संजीवनी' अभियान राबवले जात आहे

''मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना न्यायालयात कायदेशीररित्या उत्तर देईन" बनावट जात प्रमाणपत्राच्या वादावर सहर शेख म्हणाल्या

पुढील लेख
Show comments