मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लब इथं मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि इतर नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असून त्यानंतर ते राज्याचा दौरा करणार आहेत.
१ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक होतांना दिसत आहे. मनसे अध्यक्षांचा अयोध्या दौरा चर्चेत आला आहे.
लोकसभा निहाय वरिष्ठ नेते मंडळी मतदारसंघात जावून आढावा घेतील. त्यानंतर त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहेत. २७ फेब्रुवारीला मनसेने कुसुमाग्रज जयंती दिवशी मराठी भाषा दिवस सुरू केला. आता सर्वजण साजरा करत आहेत आनंद आहे. त्यादिवशी मनसे स्वाक्षरी मोहीम राबवणार असून राज ठाकरे काही ठिकाणी यावेळी भेट देणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.