Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट

भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट
, बुधवार, 2 जून 2021 (07:53 IST)
निवडणुका आल्या की, पक्षांतराची लाट येते. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००९मधील विधानसभा निवडणुकीवेळचा असाच एक किस्सा लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात सांगितला. भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले.
 
मनसेतून बाहेर जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना त्यांनी अतुल भातखळकरांविषयीचा गौप्यस्फोट केला. “२००९ मधील विधानसभा निवडणुकीला भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं. त्यांना सांगितलं होतं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना दोन माणसं तिथे होती. त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले,” असं राज ठाकरे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन काय साध्य करू पाहत आहेत?