गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार : राज ठाकरे

शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (16:35 IST)
मनसेचे काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरतात. अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.  काही लोक जाणीवपूर्वक बदनाम करतात. अशी नाव माझ्याकडे आली आहेत. ती नाव मी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले.
 
राज ठाकरेंचा दौरा पूर्ण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे कार्यकर्ते सांगतात.  राज ठाकरे आज औरंगाबादेत आले आता ते आज परतणार आहेत. राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या चाचपणीसाठी गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत झालं. या दौऱ्यादरम्यान औरंगाबादच्या नामांतराचा वाद रंगला.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सगळे कर्ज फेडतो पण भारतात जाणार नाही : मल्ल्या