Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार : संदीप देशपांडे

Webdunia
बुधवार, 28 जुलै 2021 (15:44 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती.मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला आहे.नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे,अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
 
संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला.अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे.दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला.
 
नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे.सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत,असं त्यांनी सांगितलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला घ्यावी लागणार माघार?

LIVE: महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणाले-किरीट सोमय्या

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महायुतीचा विजय सहन नाही झाल्याने संजय राऊतांनी मानसिक संतुलन गमावले-किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments