rashifal-2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन; रायगडाच्या पायथ्याशी भव्य सोहळ्याचे आयोजन

Webdunia
सोमवार, 9 मार्च 2026 (09:22 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे साजरा होत आहे.
ALSO READ: वसईत महिला दिनी बॅगेत सापडली २० दिवसांची नवजात मुलगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी (मनसे) आजचा दिवस म्हणजेच ९ मार्च २०२६ अत्यंत ऐतिहासिक आहे. पक्षाच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने राज ठाकरे यांनी रायगडाच्या पायथ्याशी भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील शाळांमधील मुलींना लाठी आणि कराटे प्रशिक्षण दिले जाईल; योजना जून २०२६ मध्ये सुरू होणार
मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी यावेळचा वर्धापन दिन मुंबईऐवजी किल्ले रायगडाच्या सानिध्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी सहकाऱ्यांसह गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे मुख्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तसेच या २० व्या वर्धापन दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षाची नवी सदस्य नोंदणी मोहीम.
संपूर्ण महाराष्ट्रभर मनसेची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, तरुणांना मोठ्या संख्येने पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी होणाऱ्या मुख्य सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

पक्षाचा २० वर्षांचा प्रवास
९ मार्च २००६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवरून सुरू झालेला हा प्रवास आज २० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
२००९ चा सुवर्णकाळ: जेव्हा मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.
नाशिक महापालिका: मनसेची सत्ता असलेल्या नाशिकमधील विकासकामांची आजही चर्चा होते.
बदलती भूमिका: 'मराठी कार्ड' पासून 'हिंदुत्वा'पर्यंत झालेला पक्षाचा प्रवास या २० वर्षांतील सर्वात मोठा बदल मानला जातो.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते रायगड परिसरात दाखल झाले आहे. "नवे ध्येय, नवा झेंडा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. या सोहळ्यामुळे रायगड परिसरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे.
ALSO READ: Nagpur Blast : नागपूरच्या राऊळगाव स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पूजा साहित्य समजून दोन लाख रुपये कालव्यात विसर्जित केले; अग्निशमन दलाच्या अथांग प्रयत्नानंतर मिळाल्या नोटा

IND vs NZ: टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला

Nagpur Blast : नागपूरच्या राऊळगाव स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला

१ एप्रिलपासून नवीन रेशन कार्ड नियम लागू होणार; अपात्र कार्ड बंद होण्याची शक्यता

वसईत महिला दिनी बॅगेत सापडली २० दिवसांची नवजात मुलगी

पुढील लेख
Show comments