Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा-पृथ्वीराज चव्हाण

webdunia
रविवार, 18 जुलै 2021 (10:36 IST)
"ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले होते. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. मात्र, भेटीत काय झाले याची माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही", अशी टिप्पण्णी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
"काँग्रेसची १९९९ पासूनची निवडणुकांची परंपरा सुरु आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपवाद सोडल्या, तर स्वबळावर सोडल्या आहेत. मात्र विधानसभा, लोकसभांची रणनीती ही केंद्रातून ठरते. अंतिम निर्णय श्रेष्ठी घेत असतात. प्रदेशाध्यक्ष पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवा, आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करु, असे सांगत आहेत. मात्र, त्याचा महाआघाडी सरकारवर काही परिणाम होईल", असा तर्क काढणे योग्य नाही.
 
"महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे चालेल. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल.मात्र,अध्यक्षपदी कोण असेल हे काँग्रेस श्रेष्ठी ठरवतील",असं चव्हाण म्हणाले.
 
"महाराष्ट्रात ईडीच्या (ED) एवढ्या चौकशा सुरु आहेत.मात्र, त्या शेवटपर्यंत जात नाहीत.कुठेतरी अडकून बसते. त्यात काय तडजोड होते की काय माहीत नाही, असा आरोप करुन आमदार चव्हाण म्हणाले, एकाही ईडीच्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आहे, ती शिक्षा कोर्टाने दिली आहे, हे माझ्या ऐकीवात नाही", असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर प्रदेशातील कावड यात्रा रद्द