माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र म्हणतात मोदिजींचे अभिनंदन

शनिवार, 25 मे 2019 (10:16 IST)
लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा मोठा विजय मिळविला आहे, त्याबददल त्यांचे अभिनंदन करीत आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. देशभरातील निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे त्या बददल पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचे अभिनंदन. एकूणच या निवडणुकीचे अवलोकन करता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी खूप मोठे परीश्रम घेतले. त्यांनी केरळ मधील वायनाड मतदार संघातून देशातील सर्वांधिक मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. त्या बददल त्यांचेही अभिनंदन करतो आहे. काँग्रेस आणि संयुक्त पुरांगामी आघाडीतील घटक पक्षानी अत्यंत जिददीने ही निवडणूक लढवली. त्या बददल या पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहेत जनतेने जो कौल दिला आहे. तो स्विकारून त्याचा आम्ही सन्मान करीत आहोत. या निकालानंतर आत्मपरीक्षण, चिंतन करून नव्या उमेदीने काँग्रेस पूढचे पाऊल टाकेल असा विश्वास आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

पुढील लेख लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेसचे