Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई बाबा 2 वर्षाच्या मुलीला प्राणिसंग्रहालयात घेऊन जात असताना अपघाताला बळी पडले, चिमुकलीचा मृत्यू

आई बाबा 2 वर्षाच्या मुलीला प्राणिसंग्रहालयात घेऊन जात असताना अपघाताला बळी पडले, चिमुकलीचा मृत्यू
, शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (16:31 IST)
मुंबईतील घाटकोपर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. परळ येथे रस्त्याच्या बांधकामामुळे घडलेल्या अपघातात एका 2 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुलीचे पालक नववर्षाच्या निमित्ताने तिला भायखळा प्राणी संग्रहालयात घेऊन जात असताना त्यांची दुचाकी नरे मैदानाच्या जवळ रस्त्याचे काम सुरु असल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि ते तिघे रस्त्यावर पडले मागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने त्यांना चिरडले. घटनास्थळी उपस्थित वाहतुकपोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथे पंत नगर परिसरात राहणारे मनोज पवार हे एका खासगी कंपनीत कामाला आहे. नववर्षाच्या दिवशी त्यांनी कुटुंबासह भायखळा प्राणिसंग्रहालय जाण्याचा बेत आखला. ते दुचाकीवरून बायको विद्या आणि 2 वर्षाच्या श्राव्याला घेऊन परळ येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वरून जात असताना नरे पार्क मैदानाजवळ रस्त्याचे काम सुरु होते.
ALSO READ: प्रसूती वेदना होत असताना महिलेला हृदयविकाराच्या झटक्यानं आई आणि बाळाचा मृत्यू
त्यात त्यांची दुचाकी घसरली आणि ते तिघे रस्त्यावर पडले आणि त्यांना मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने चिरडले. त्यात चिमुकली श्राव्याचा मृत्यू झाला तर विद्या आणि मनोज पवार यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी टेम्पोचालक जंगबहादूर याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालकाला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसूती वेदना होत असताना महिलेला हृदयविकाराच्या झटक्यानं आई आणि बाळाचा मृत्यू