rashifal-2026

मुंबई: अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका Photo

Webdunia
मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली.

मुंबई-नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसचे डबे सकाळीच घसरल्याने बाहेरगावी जाणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
 
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

धुळ्याच्या प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

India Open: लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, सात्विक-चिराग आणि श्रीकांत बाहेर

IND vs USA U19 : भारतीय अंडर-19 संघाने अमेरिकेला सहा विकेट्सने हरवले

पुढील लेख
Show comments