Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यू इअर सेलिब्रेशन : 'या' महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद

mumbai goa highway
, शनिवार, 30 डिसेंबर 2017 (15:06 IST)

मुंबई-पुणे जुना हायवे आणि मुंबई गोवा हायवेवर, ३ दिवस अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक बंदी  फक्त रायगड जिल्ह्यालाच लागू आहे.

आज आणि उद्या सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत रायगड जिल्ह्यातले हे दोन प्रमुख हायवे, आणि इतर प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना जाता येणार नाही. न्यूईयरच्या वेळी पुणे, कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप असते. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्‍ह्यातून जाणारया मुंबई - गोवा व मुंबई - पुणे महामार्गासह प्रमुख रस्‍त्‍यावरील अवजड वाहतूक 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्‍यात येणार आहे . 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्‍यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल . 31 डिसेंबर व 1 जानेवरी रोजीदेखील ही वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार असून रस्‍त्‍यातील अवजड वाहने पेट्रोल पंप तसेच धाब्‍यांवर उभी ठेवण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे . 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या विरोधात पोलिसांत तक्रार